अजिंक्य देव
saptrang@esakal.com
मी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘अर्धांगी’ हा माझा पहिला चित्रपट. त्या चित्रपटासाठी मला विशेष अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. खरंतर या क्षेत्रात येण्याचा माझा तसा काही विचार नव्हता. मी फक्त माझ्या आई-वडिलांना मोठ्या पडद्यावर पाहिलं होतं. ‘अर्धांगी’ या चित्रपटात मी सुरुवातीला एक डान्स परफॉर्मन्स केला. त्यानंतर हळूहळू एकेक सीन करीत गेलो आणि अभिनयाचा अनुभव मिळत गेला. या चित्रपटात रवींद्र महाजनी, आशा काळे, कुलदीप पवार, अर्चना जोगळेकर, निवेदिता जोशी, भारती आचरेकर आणि रवी पटवर्धन यांसारखे दिग्गज कलाकार होते.