Premium|Journey of a Teacher : प्रश्‍नांभोवतीचा संघर्षच शिकवतं जगणं

A Teacher’s Journey and First Posting : शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नोकरीच्या पहिल्या संधीची वाट पाहणाऱ्या तरुणांची धडपड, गावाच्या नियुक्तीसाठीची उत्सुकता आणि व्यवस्थेतील हस्तक्षेप यांचा अनुभव सांगणारा लेख.
A Teacher’s Journey and First Posting

A Teacher’s Journey and First Posting

esakal

Updated on: 

किशोर बळी

आपल्या खिडकीतून दिसतं तेवढंच नसतं आकाश! म्हणून आपल्या कक्षा रुंदावण्याची कधी कधी मोठी संधी येते. त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं की छान वाटत असतं. उद्याचा दिवस कसा असेल, या प्रश्‍नांभोवतीचा संघर्षच माणसाला जगणं शिकवत असतो...

शिक्षक व्हायची इच्छा लहानपणापासूनच मनात घर करून बसली होती. मला घडवणाऱ्या माझ्या शिक्षकांचा आदर्श डोळ्यांपुढे होता. शिक्षक होऊन चिमुकल्यांच्या आयुष्याला सुंदर आकार देणं, ही गोष्ट मला नेहमीच मौलिक वाटत आली...

दारव्हा पंचायत समितीच्या आवारात पंधरा-वीस शिक्षणसेवक आदेशाची वाट पाहात ताटकळत बसलेले होते. नुकतेच डीएड होऊन बाहेर पडलेले विशीतले हे तरुण. यात तरुणीही होत्या. आयुष्यातील पहिलीवहिली नोकरी. तीही मास्तरकी. कुठलं गाव मिळेल याची प्रचंड उत्कंठा आणि तितकीच चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. काही जण नित्यनेमाने हजर असायचे, तर काही सही करायलाही यायचे नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार चालला होता. कमी अंतरावरील गाव मिळावे, म्हणून अनेकांची धडपडही चालली होती. कुणासाठी मंत्र्याचा तर कुणासाठी आमदाराचा फोन बीडीओंना आल्याचं कानावर पडत होतं. टेबलाखालून झालेल्या व्यवहारांची कुजबुजही कानावर येत होती.

Loading content, please wait...