

Godrej Capital Technology Leader
esakal
ज्योतिर्लता बी.
अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक व्यवहार अगदी घरबसल्या करणे शक्य झाले आहे. बँकिंग, विमा, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्याही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. नवनवे तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना अधिक उत्तम आणि जलद सेवा देण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. अशा काही कंपन्यांमध्ये ‘गोदरेज कॅपिटल’ ही एक आघाडीची बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे. आधुनिक तंत्रज्ञानाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन, झालेला फायदा, नव्या योजना अशा विविध पैलूंबाबत कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) आणि सीआयओ ज्योतिर्लता बी. यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली मुलाखत...