
कल्याणी शंकर
कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या खदखद सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामधील सत्तासंघर्षाने पुन्हा डोके वर काढले आहे. विविध मुद्द्यांवरून दोघांमध्ये असलेले मतभेद स्थानिक माध्यमांतून चव्हाट्यावर आले आहेत. पक्षातील अनेक दिग्गजांच्या अंदाजानुसार मुख्यमंत्रिपदात बदल होऊ शकतो. सिद्धरामय्या यांच्याऐवजी डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे राज्यातील काँग्रेसमध्ये एक प्रकारची अस्थिरता आहे. सत्तारूढ काँग्रेस पक्ष अंतर्गत संघर्ष, शिस्तभंग आणि गटबाजी यांसारख्या समस्यांशी झगडत आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.