Premium|Keeladi vs Rakhigarhi Ancient Indian History : कीळडी उत्खननातून दक्षिण भारताच्या प्राचीन नागरीकरणाचा नवा इतिहास; राखीगडीशी तुलना का होतेय?

Keeladi Archaeological Site and Ancient Indian Civilization : वैगई नदीकाठच्या कीळडी उत्खननातून दक्षिण भारतातील प्राचीन नागरीकरणाचे नवे पुरावे समोर आले. राखीगडी आणि कीळडीच्या संशोधनातून भारतीय इतिहासाच्या प्रारंभाबाबत कोणते प्रश्न निर्माण झाले?
Keeladi vs Rakhigarhi Ancient Indian History

Keeladi vs Rakhigarhi Ancient Indian History

esakal

Updated on: 

मयूरेश प्रभुणे - saptrang@esakal.com

कीळडी हे वैगई नदीच्या काठावरील पुरास्थळ गेल्या काही वर्षांत अभ्यासकांच्या चर्चेचे केंद्र ठरले आहे. येथे गेल्या दशकभरात झालेल्या उत्खननांमधून दक्षिण भारतातील पहिल्या नागरीकरणाचा काळ आधीच्या समजापेक्षा बराच आधी सुरू झाल्याची बाब समोर आली. मात्र, ही गोष्ट फक्त या अभ्यासापुरती मर्यादित राहिली नाही, तर तमिळनाडूच्या यावर्षी पार पडलेल्या निवडणुकीतील एक मुख्य मुद्दा बनली. उत्तरेतील राखीगडी विरुद्ध दक्षिणेतील कीळडी असा नवा वाद या संशोधनातून निर्माण झाला. याचा प्रत्यक्ष उत्खननाच्या जागी भेट देऊन घेतलेला वेध...

दक्षिणोत्तर किंवा पूर्व- पश्चिम अशा कोणत्याही मार्गाने प्रवास केला, तरी भारताची समृद्ध विविधता नजरेस पडते. या विविधतेपैकी मग भारत म्हणून आपली ओळख कोणती? आफ्रिकेतून भारतीय उपखंडात पन्नास- साठ हजार वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेली पहिली भटकी टोळी आपले पूर्वज होते, की सिंधू- सरस्वतीच्या नद्यांच्या खोऱ्यातील तत्कालीन प्रगत संस्कृती विकसित करणारे पहिले भारतीय म्हणावेत? ऐतिहासिक कालखंडात वैदिक, बौद्ध, जैन तत्त्वज्ञानाचा स्वीकार, प्रसार करून आजच्या भारतीय सामाजिक, सांस्कृतिक रचनेची पायाभरणी केलेल्यांना आपले मूळ मानावे की, १९४७ पासूनच्या लोकशाहीतील सर्वसमावेशकता हीच आपली नवी सुरुवात मानवी? राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचारधारांनुसार प्रत्येकाचा इतिहासाचा प्रारंभबिंदू वेगवेगळा असतो. तो जसा वेगवेगळ्या काळातील असतो, तसाच तो वेगवेगळ्या प्रदेशांमध्येही असतो.

Loading content, please wait...