
परिमल माया सुधाकर
ज्या मुद्द्यांमुळे गेली दोन दशके नितीशकुमार बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत, ते सर्व मुद्दे यंदाच्या निवडणुकीतदेखील चर्चिले जाणार आहेत. मात्र, यंदा महत्त्वाचा फरक हा असेल की, नितीशकुमार यांचे विरोधक नेमक्या त्याच मुद्द्यांवरून त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा जोरदार प्रयत्न करतील.
बि हार विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राबवलेली बिहारमधील मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया वादाचा विषय बनली आहे. या पद्धतीवरील आक्षेप, न्यायालयीन लढाई आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले ‘व्होट-चोरी’चे प्रश्न यामुळे हे मुद्दे बिहारमधील प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत.