
स्ट्रेट ड्राइव्ह
‘‘सर तुम्ही असे प्रशिक्षण द्या की आमचा मुलगा मोठा झाला की आयपीएल संघात निवडला गेला पाहिजे.’’ पालक मैदानावरील प्रशिक्षकांना ठामपणे सांगत होते. अनुभवी प्रशिक्षक पालकांना समजावून देत होते, की मुलाला पहिली खेळाची गोडी लागायला हवी. त्याने किंवा तिने भरपूर मेहनत करायला हवी. दडपणाखाली कामगिरी करायचे तंत्र अंगी बाणवण्याकरिता खूप सामने खेळायला हवेत. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला तरच खेळाडू वरच्या स्तरावर खेळायचे स्वप्न साकारू शकतो. पोटतिडकीने समजावून देऊनही पालकांच्या त्या गोष्टी पचनी पडत नव्हत्या.