esakal | स्टीव्ह जॉब्स यांचा एक मेल आणि कंपनीची उलाढाल पोहोचली 2 ट्रिलियनवर
sakal

बोलून बातमी शोधा

Steve Jobs}

स्टीव्ह जॉब्स यांचा एक मेल आणि कंपनीची उलाढाल पोहोचली 2 ट्रिलियनवर

sakal_logo
By
सुमित बागुल

ios स्टीव्ह जॉब्स ! 'स्टीव्ह जॉब्स' हे नाव ऐकल्यावर, वाचल्यावर किंवा त्यांचा फोटो ओझरता जरी आपल्या डोळ्यासमोरून गेला तरी आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर कायम वाटतो. त्यांना पाहून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते असं म्हंटल तर अजिबात वावगं ठरणार नाही. स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या निर्णय क्षमतेवर, अ‍ॅपल कंपनीला जगभरातील एक प्रीमियम ब्रँड तर बनवलाच. पण काळानुरूप केलेले विविध बदल आणि गुणवत्तेच्या जोरावर आज अ‍ॅपल कंपनी यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करतेय. दिवसेंदिवस अ‍ॅपलच्या ग्राहकांमध्ये वाढ देखील होतेय. आज या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण स्टीव्ह जॉब्स यांच्याबद्दलची एक अनोखी कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही कुठेही वाचलं नसेल. हा लेख आहे स्टीव्ह जॉब्स यांना आलेल्या एका ई-मेल चा आणि त्यावरील जॉब्स यांच्या उत्तराचा अर्थात रिप्लायचा. जॉब्स यांच्या अचूक निर्णयामुळेअ‍ॅपलसारखी कंपनी आज थेट 2 ट्रिलियनचं भांडवल असणारी बलाढ्य कंपनी म्हणून जगभरात नावारूपास आली आहे.

स्टीव्ह जॉब्स यांचं संपूर्ण नाव स्टीफन पॉल जॉब्स. स्टीव्ह यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 24 फेब्रुवारी 1955 रोजी झाला. जॉब्स हे सॅन फ्रान्सिस्कोमध्येच लहानाचे मोठे झाले. जॉब्स हे रीड महाविद्यालयाचे विद्यार्थी, 1972 मध्ये ते याच कॉलेजचे ड्रॉपआउट देखील राहिले आहेत. जॉब्स यांनी 1974 मध्ये आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या शोधात भारताचा दौरा देखील केला होता. त्यानंतर जॉब्स पुन्हा अमेरिकेत परतले.

sdk

sdk

आता जाणून घेऊया ई-मेलचा किस्सा :

2007 मध्ये स्टीव्ह जॉब्स हे अ‍ॅपल कंपनीचे तत्कालीन CEO होते. हा किस्सा आहे स्टीव्ह जॉब्स आणि त्यांच्या कंपनीतील सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बर्ट्रांड सर्लेट यांच्यात झालेल्या एका ई-मेल संवादाचा. आजकाल सर्वांच्या हातात दिसणारा लॅव्हिश आयफोन 2007 मध्ये नवीनच बाजारात आला होता. आयफोन बाजारात येऊन अवघे तीन महिने उलटले होते. त्या काळात आयफोनमध्ये केवळ अ‍ॅपलने तयार केलेले ऍप्लिकेशन्स चालत असत. जेंव्हा आयफोन लॉन्च झाला तेंव्हा आयफोनमध्ये आधीच इन्स्टॉल केलेले केवळ १६ ऍप्लिकेशन असत. जॉब्स यांनी त्यांच्या डेव्हलपर्सना खास आयफोनसाठी असे काही वेब ऍप्लिकेशन बनवण्यास सांगितले जे SDK म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटचा वापर न करता खास आयफोनवर आणि सफारी या ब्राऊझरवर देखील उत्तमरित्या चालू शकतील.

अ‍ॅपल कंपनीसाठी मैलाचा दगड

मात्र वेब ऍप्स हे मोबाईलच्या मूळ ऍप्लिकेशन्सपेक्षा वेगळे असल्याने आयफोन ग्राहकांनी थर्ड पार्टी ऍप वापरण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. वापरकर्त्यानी थेट फोनला जेलब्रेक करण्यास सुरवात केली आणि त्या मध्यमातून आयफोनवर वेगवेगळे थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वापरण्यास सुरवातही केली. आता अ‍ॅपल कंपनीला हे थांबवण्यासाठी काहीतरी योग्य पाऊल उचलणे गरजेचं होतं. त्यानंतर अ‍ॅपलने SDK म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटचा वापर करून वेब ऍप्लिकेशन तयार करण्यास सुरवात केली आणि हाच अ‍ॅपल कंपनीसाठी मैलाचा दगड ठरला.

ई-मेल मध्ये काय सुचवलं गेलं

सर्लेट आणि जॉब्स यांच्यात झालेल्या ई-मेल संवादात सर्लेट यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटचा वापर करता वेब ऍप्लिकेशन्स बनवण्याच्या संकल्पनेवर भर दिला गेला पाहिजे असं जॉब्स यांना सुचवलं होतं. अर्थात हे सुचवताना लोकांसमोर कोणत्याही सपोर्टशिवाय किंवा काहीतरी न घेऊन जाणे ही संकल्पना होतीच. मात्र तसं करणे ही काळाची गरज असल्याचं त्या ई-मेल मध्ये नमूद करण्यात आलं होतं. यामध्ये सर्लेट यांनी काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले होते. ज्यामध्ये उपभोक्त्यांची माहिती जपणे, नवीन डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म तयार करणे आणि आपण डेव्हलप केलेले API कालानुरूप टिकाऊ आहेत की नाही, त्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन केलंय की नाही हे काही महत्त्वाचे मुद्दे होते.

ios

ios

स्टीव्ह जॉब्स यांचं एका ओळीचं उत्तर :

यावर स्टीव्ह जॉब्स यांनी केवळ एकाच ओळीत उत्तर दिलं होतं. जॉब्स म्हणालेत, "Sure, as long as we can roll it all out at Macworld on Jan 15, 2008. म्हणजेच,"नक्कीच ! जानेवारी 15, 2008 रोजी होणाऱ्या 'मॅकवर्ल्ड' कार्यक्रमाच्या आधी आपण यावर काम पूर्ण करू शकणार असू, तर नक्कीच आपण हे करायला हवं", असं स्टीव्ह जॉब्स यांनी उत्तर दिलं. स्टीव्ह जॉब्स यांनी जेंव्हा हा रिप्लाय दिला तेंव्हा 2008 च्या 'मॅकवर्ल्ड' कार्यक्रमाला केवळ 3 महिने शिल्लक होते. या ई-मेल वरील संभाषणाच्या केवळ दोन आठवड्यानंतर स्टीव्ह जॉब्स यांनी आपली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) पॉलिसी जाहीर केली.

Apple Logo

Apple Logo

या एका रिप्लायमुळे आज अ‍ॅपलसारख्या कंपनीची संपूर्ण बिझनेस स्ट्रॅटेजी बदलली आणि स्टीव्ह जॉब्स यांची कंपनी थेट २ ट्रिलियन भांडवल असणारी कंपनी म्हणून अस्तित्वात येऊ शकली.

यामागील तात्पर्य काय तर,....

अ‍ॅपल कंपनीने घोषणा केल्याप्रमाणे मार्च 2008 मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) पॉलिसी बाजारात उतरवली. त्यानंतर लगेचच जुलै 2008 मध्ये ऍप स्टोअर देखील बाजारात आलं. जॉब्स यांच्या एका ओळीच्या रिप्लायचा मतितार्थ किंवा त्यामागील भूमिका म्हणजे, एक डेडलाईन/अंतिम मुदत निश्चित करून आपलं निर्धारित काम पूर्ण करणे हाच होता.