
कुणाल कामरामुळे मुंबईतील 'द हॅबिटॅट' चर्चेत आलं. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणाची तोडफोड केली आणि त्यांनीही हे ठिकाण बंदच करायचं ठरवलं. आता ते चांगलं का वाईट यावर सगळ्यांनी सगळं बोलून झालं आहे, पण एक प्रश्न राहतोच. अगदी कुणाल कामरापासून वरुण ग्रोव्हरपर्यंत आणि अनिश गोरेगावकरसारख्या मराठी स्टँडअप कॉमेडियनपर्यंत सगळ्यांच्या कॉमेडी व्हिडीओत मागे 'द हॅबिटॅट'चा लोगो दिसतोच. हे ठिकाण कॉमोडियन्ससाठी इतकं महत्त्वाचं का आणि केव्हा झालं? या व्हेन्यूमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे त्याचं इतकं नाव झालंय?