
सुदर्शन चव्हाण
chavan.sudarshan@gmail.com
‘आज मी एक छान गोष्ट बघून आलो!’ असं शेवटचं कुठला सिनेमा बघून वाटलं होतं आठवतंय का? बॉलीवूडमध्ये तर सध्या फक्त प्रोजेक्ट बनत आहेत. हा हिरो हातात आहे, हा विषय चालतो आहे, हा जॉनर जोरात आहे... या सगळ्याला एकत्र करायचं आणि करायचा सिनेमा. त्या मानाने तमिळ, मल्याळम सिनेमाला सध्या एकंदरीतच चांगले दिवस असल्याने तिथले निर्माते थोडा हात खुला सोडत लेखक, दिग्दर्शक अशा सर्वच कलाकार मंडळींना थोडं जास्तीचं स्वातंत्र्य देत आहेत, असं किमान त्यांच्या विषयांच्या वैविध्यातून दिसतं.