Premium|Study Room : भारत-चिन संबंधामधील लडाखचे महत्त्व

Ladakh India China conflict : हिमालयातील लडाख प्रदेश भारत–चीन सीमावादामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरला आहे. गलवान खोरे संघर्षानंतर तणाव वाढला असून भारताने लष्करी सज्जता, पायाभूत सुविधा आणि कूटनीती यांचा समन्वय साधत राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
Ladakh India China conflict

Ladakh India China conflict

esakal

Updated on

लेखक : गौरव बाळे

हिमालयाच्या उंच आणि दुर्गम प्रदेशात वसलेले लडाख हे आज भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक क्षेत्र ठरले आहे. भारत–चीन संबंधांमध्ये लडाखमधील सीमावाद हा केवळ भौगोलिक सीमारेषेपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो भारताच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आशियातील सामरिक संतुलनाशी थेट निगडित झाला आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर सीमेवरील शांतता आणि स्थैर्य या संकल्पनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे लडाखमधील परिस्थिती भारताच्या संरक्षण व परराष्ट्र धोरणाची खरी कसोटी ठरत आहे.

लडाखचे भौगोलिक व सामरिक महत्त्व

लडाख हा प्रदेश भारत, चीन आणि पाकिस्तान या तीन अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या सीमांच्या संगमस्थळी स्थित असल्यामुळे त्याचे सामरिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. हा प्रदेश चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेश आणि झिनजियांग प्रांताला लागून असून भारत–चीनदरम्यान सुमारे ३,४८८ किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा येथे पसरलेली आहे. सियाचीन हिमनदी, काराकोरम, दौलत बेग ओल्डी आणि पँगॉन्ग त्सो यांसारखे भाग भारताच्या सीमासुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या क्षेत्रांवरील भारताचे नियंत्रण चीन–पाकिस्तान आर्थिक मार्गावर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com