Premium|Financial Planning : लक्ष्मीपूजनापासून लक्ष्मीसंवर्धनाकडे; आर्थिक नियोजनातून कुटुंबाची समृद्धी कशी वाढेल?

Wealth Creation and Financial Planning : दिवाळीत लक्ष्मीपूजनासोबत कमाईचे योग्य नियोजन आणि बचतीचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. महिला आणि पुरुष यांनी एकत्र येऊन आर्थिक निर्णय घेतल्यास कुटुंबाची संपत्ती अधिक सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी होऊ शकते.
Wealth Creation and Financial Planning

Wealth Creation and Financial Planning

esakal

Updated on: 

ॲड. प्रतिभा देवी - pratibhasdevi@gmail.com

लक्ष्मीपूजन करू या, लक्ष्मी जपू या,

कष्टाच्या घामातून संपत्ती जमवू या,

आजची कमाई उद्याची ताकद बनू दे,

संवर्धनाने घरकुल समृद्ध होऊ दे...

दिवाळीच्या मंगलमय दिवसांत आपण अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने लक्ष्मीपूजन करतो. घराची स्वच्छता करणे, दिव्यांची आरास करणे आणि उत्तररात्री किंवा संध्याकाळी धनधान्य, सोन्या-नाण्याची पूजा करून ‘माता लक्ष्मी’चे स्वागत करणे, ही आपली परंपरा आहे. परंतु, बदलत्या काळासोबत केवळ लक्ष्मीचे पूजन पुरेसे नाही, तर लक्ष्मीचे संवर्धन (आर्थिक नियोजन आणि वाढ) करणे ही सर्वांत मोठी गरज बनली आहे.

लक्ष्मीचे पूजन ते लक्ष्मीचे संवर्धन (आर्थिक नियोजन आणि वाढ) हा प्रवास केवळ महिलेचा किंवा केवळ पुरुषाचा राहिलेला नाही. आजच्या आधुनिक युगात महिला आणि पुरुष दोघेही जेव्हा एकत्र येऊन लक्ष्मीपूजनाकडून लक्ष्मीसंवर्धनाकडे पाऊल टाकतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने कुटुंबात शाश्वत आर्थिक समृद्धी येते.

Loading content, please wait...