Premium|Adilshahi Inam system: आदिलशाही सल्तनतीतील गावांचा कारभार कसा चालायचा माहितीये का..?

Hereditary Rewards: एकूण जमिनीपैकी किती इनाम म्हणून दिली जाईल याबद्दल कोणताही नियम किंवा एकसारखेपणा नव्हता. सामान्यतः, काही इनाम जमीन वतनदारांना त्यांनी सरकारला दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात दिली जात असे, तर काही इतर व्यक्तींना विविध कारणांसाठी वंशपरंपरागत हक्क म्हणून दिली जात असे
adilshahi inam system
adilshahi inam systemEsakal
Updated on: 

केदार फाळके

editor@esakal.com

श्रीशिवछत्रपती भारत भाग्यविधाता

आदिलशाही सल्तनतीमध्ये इनामे केवळ जमिनीच्या स्वरूपातच असणे आवश्यक नव्हते; ती रोख किंवा वस्तू रूपात वंशपरंपरागत हक्क म्हणूनही दिली जात होती. धार्मिक स्थळांचे प्रमुख, कर्मचारी, जसे की मशिदींचे मुल्ला-मौलवी इत्यादींना परगण्याच्या महसुलातून रोख रक्कम, धान्य किंवा दिव्यासाठी तेल या स्वरूपात वार्षिक इनाम दिले जाऊ शकत होते. इनामे सहसा मुकासदाराच्या आदेशाने दिली जात असत. मुकासा प्रशासनाकडून बदलला किंवा हस्तांतर केला जाऊ शकत होता.

एका गावाला लागून असलेल्या एकूण जमिनीचा तपशील आणि तिची महसूल आकारणी जुन्या जमिनीच्या नोंदींमध्ये नोंदविलेली आढळते. जमिनीचे वर्गीकरण बागाईत किंवा जिराईत (पावसावर अवलंबून असलेली) असे केले जात असे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com