

Types of Landslides
esakal
लेखक : सागर रेपाळे
भूस्खलन म्हणजे डोंगर किंवा उतारावरील दगड, माती, खडक किंवा इतर ढिगारा गुरुत्वाकर्षणामुळे अचानक किंवा हळूहळू खाली घसरणे होय. हे प्रामुख्याने मुसळधार पाऊस, भूकंप, बर्फ वितळणे, पूर आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे घडते. भारतातील हिमालय, पश्चिम घाट आणि ईशान्य भारत हे भूस्खलनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश आहेत. हवामान बदलामुळे वाढणारी अतिवृष्टी आणि अनियोजित विकास यांमुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
भूस्खलनाचे विविध प्रकार आढळतात. सहभागी पदार्थांच्या आधारे खडक घसरण (Rock Slide), माती घसरण (Soil Slide), अवशेष घसरण (Debris Slide) आणि चिखल प्रवाह (Mudslide) हे प्रकार आहेत. तसेच, प्रवाहाच्या स्वरूपानुसार अवशेष प्रवाह (Debris Flow), मृदा प्रवाह (Earth Flow), चिखल प्रवाह (Mudflow) आणि संथ घसरण (Creep) हे प्रकार आढळतात.