
हृदयनाथ मंगेशकर
kunteshreeram@gmail.com
भारतरत्न लता मंगेशकर यांना मीराबाईंची भजने रेकॉर्ड करण्याची इच्छा झाली. त्यांनी ती इच्छा हृदयनाथ यांच्याजवळ व्यक्त केली. ‘मीराबाईंची तपस्या आणि जीवन समजून घे आणि मग त्यांची गाणी आपण रेकॉर्ड करू’ असं त्यांनी हृदयनाथांना सांगितलं. निर्मितीच्या कालखंडापूर्वीचा विचाराचा हा काळ वेगळाच होता. पंडितजींनी त्या काळाच्या आठवणी जागवल्या आहेत....
मी दीदीच्या खोलीत प्रवेश केला. ‘‘आवा, आवा, बैठा,बैठा,’’ दीदी नेहमीप्रमाणे अतिशय आनंदाने म्हणाली. कुठल्यातरी चित्रपटातील हे वाक्य तिने पाठ केले होते, मी, उषाताई, मयूरेश आम्ही खोलीत प्रवेश केला की दीदी हे वाक्य हमखास म्हणायची.