Premium| Lata Mangeshkar first performance: सोलापूरच्या त्या मैफिलीमध्ये स्वरांची जादू झाली, दीनानाथांचा स्वर खोकल्यात हरवला; पण लताबाईंचा स्वर गगनाला भिडला

Dinanath Mangeshkar last concert: एका मैफिलीमध्ये अचानक दीनानाथ मंगेशकर यांना खोकल्याचा झटका आला आणि ते गायला अपयशी ठरले. त्याक्षणी लता मंगेशकरने पहिल्यांदा गायलं आणि तिनं एक अद्वितीय अध्याय सुरू केला
Lata Mangeshkar
Lata Mangeshkaresakal
Updated on

हृदयनाथ मंगेशकर

saptrang@esakal.com

दीनानाथ मंगेशकर आणि गणूमामा व लता यांनी रियाज केला. दुसऱ्या दिवशी जलसा सुरू झाला आणि समोर खास त्यांना ऐकण्यासाठी आलेले श्रोते, दीनानाथ मागच्या मैफिलीच्या आठवणीत रंगले, पावसाची एक सरही येऊन गेली, जलसा सुरू तर झाला, पण त्या दिवशी घडलं वेगळंच. काय घडलं तिथं? सांगत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर...

गणूमामा चिडून म्हणाला,

‘‘मास्तर ! हे विद्याचौर्य आहे, तुम्हाला

ही श्रुती जर ज्ञात होती, तर ती तुम्ही मला

का शिकविली नाही? हे विद्याचौर्य आहे,

तुम्ही मला फसविलेत, माझी फसवणूक

केली, पण मास्तर ! या आजारात

या अवस्थेत तुम्ही या सुरात,

तारसप्तकातला सुदगंधार लावू शकाल? ’’

बाबा आत्मविश्‍वासाने म्हणाले,

‘‘गणपत उगा कावु नको. तू सुज्ञ आहेस,

तुला माहीत आहे की मी हा स्वर इथे

बसल्या बसल्या काही कष्ट न करता लावू

शकतो, ही आनुवंशिक सहजतेची देवदत्त

देणगी आहे.’’

‘‘बापरखुमादेवीवरू सहज निटू जाला’’

ही सहजता, संगीताचा आत्मा,

ईश्वरी कृपा, संगीत साक्षात्कार,

ही सहजता म्हणजे,

ते श्री शारदा विश्वमोहिनी.

आणि बाबांनी बसल्या बसल्याजागी

किंचित मान वर करून सुदगंधार लावला,

कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते

कधी लवचीक पाते खड्गाचे लवलवते

कधी गर्भ रेशमी पोत भर जरतारी

प्रमदेचे मादत वस्त्र जणू सळसळते

गणूमामा बाबांच्या पायावर पडून

ओक्साबोक्शी रडत म्हणाला,

‘‘मास्तर क्षमा करा, मी चुकीचे बोललो.

तुम्ही साक्षात संगीतावतार. मी तुम्हाला

काय शिकविणार? पण मास्तर प्रकृती

सांभाळा, थोडा व्यायाम करीत जा. ’’

बाबा मिश्कीलपणे हसून म्हणाले,

‘‘गणपत, व्यायामाने पैलवान तयार

होतात, गवैया नाही.’’

जसं कळीचा जीव देठातून बाहेर पडतानाच

त्यास माहीत असते की सूर्याचे ओज

आपल्या आत सोकून घेऊन संपूर्णतः

फुलायचे आहे, जन्मतःच आत्मबोधाची

जाणीव घेऊन येणाऱ्या फुलण्यास

कोण रोखू शकतं?

आपला जन्म केवळ संगीत निर्मितीसाठीच

झालाय याची परिपूर्ण जाणीव असलेले

बाबा (दीनानाथ) आत्मभान घेऊनच

जन्माला आलेले, बाबा रंगमंचाच्या

पायऱ्या हळूहळू चढत होते,

समोर एक सुबक छोटेसे स्वच्छ मैदान,

त्यावर सतरंजी, त्यावर बसलेले पाचशे

प्रेक्षक, त्याच्या पुढे पांढऱ्याशुभ्र गाद्या,

त्यावर लोडाला टेकून बसलेले दोनशे प्रतिष्ठित सोलापूरकर.

सहा माणसं बसू शकतील एवढाच रंगमंच.

बसण्यासाठी पांढऱ्याशुभ्र गाद्या,

पाठी विठ्ठल-रखुमाईचे भव्य तैलचित्र,

त्याच्या समोर समई, फुलं, हळद, कुंकू

रंगमंचाच्या दोन्ही बाजूस

गॅसच्या भगभगत्या बत्या, त्यांचा निळसर तेजस्वी

प्रकाश, त्या प्रकाशात उडणारे किडे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com