
डॉ. शशांक शहा
‘हर्निया’ या आजाराबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काहींना वाटते की हा फार किरकोळ आजार आहे, काहींना मात्र याचे धक्कादायक अनुभव येतात. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मी सर्जन म्हणून काम करताना पाहिलं आहे, की योग्य वेळी निदान झालं आणि उपचार झाले, तर हर्निया फारसा त्रास न होता बरा होऊ शकतो.
गेल्या वीस वर्षांमध्ये हर्नियाच्या शस्त्रक्रियेच्या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया मोठा छेद घेऊन केली जात असे. मात्र, आता ही शस्त्रक्रिया पद्धती मागे पडली आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे. लॅप्रोस्कोपी सर्जरीमुळे हर्नियावरील उपचार अधिक प्रगत, सुरक्षित आणि वेदनारहित झाले आहेत.