
अरविंद हाटे
arvindhate@yahoo.com
ब्रँड कसा तयार करायचा आणि व्यवस्थापित करायचा हे जाणून घेणे हे एक अत्यंत मौल्यवान कौशल्य आहे. मार्केटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म आणि संस्कृतींमध्ये आधुनिक ब्रँडिंग कसे कार्य करते याबद्दल अद्ययावत उदाहरणे ‘ब्रँड आणि ब्रँडिंग’ पुस्तकात आहेत.
‘ब्रँड आणि ब्रँडिंग’ पुस्तकाच्या लेखिका यशोदा भागवत, गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत. साधारण पंचवीस-एक वर्ष त्यांनी स्वतःची ‘दीप डिझाइन’ ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी मुंबईत यशस्वीरीत्या चालवली. या प्रवासात जाहिरात क्षेत्रात झालेले अनेक बदल व घडामोडींच्या अनुभवातून ‘बोलका कॅमेरा, जाहिरातीचं जग, ग्राफिक डिझाइनचं गारुड, ब्रँडिंगचे कधीही न बदलणारे २२ नियम’ ही पुस्तकं त्यांच्या सुलभ व ओघवत्या शैलीत आणि आपल्या कलासंपन्न साधनेतून आलेल्या प्रत्ययाचे विवेचन आहे. यशोदा भागवत स्वतः उपयोजित कलेत प्रथम पारितोषिक विजेत्या आहेत.