
एकीकडे महाराष्ट्रातल्या स्मार्ट दुचाकी स्वारीवर निघण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे कर्नाटकातल्या दुचाक्यांना मात्र ब्रेक लागलाय. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ई-बाईक टॅक्सीसाठी ठोस आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे नियम तयार करण्याचे आदेश देत, तात्पुरती बंदी घातली आहे. या निर्णयामुळे बंगळूरुसारख्या मोठ्या शहरांमध्ये कार्यरत असलेल्या रॅपिडो, ओला आणि उबर यांसारख्या ॲप-बेस्ड टॅक्सी सेवांना मोठा फटका बसला आहे, आणि अर्थातच सामान्य प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली आहे.
महाराष्ट्रातही असं होणार का? समजून घेऊया सकाळ प्लसच्या या लेखातून...