
संजय कुमार
राष्ट्रीय अन् राज्यांतील निवडणुकांत २०१३ पासून कुठलाही उमेदवार पसंत नसल्यास ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (नन ऑफ दि अबोव्ह - नोटा) हा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला. या संदर्भात ‘एखाद्या मतदारसंघात फक्त एखादाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, तरीही तेथे निवडणूक घेण्यात यावी अन् मतदारांना हा पर्याय दिला जावा,’ असे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्पष्ट केले. यामुळे ‘नोटा’ची उपयोगिता, त्याच्या सद्यःस्थितीचा मुद्दा चर्चेत आला आहे.