
अरविंद रेणापूरकर
arvind.renapurkar@esakal.com
लाइफस्टाइल व्हेईकल्स हा शब्द नियमित वाहनांसाठी नसून वापरकर्त्याच्या जीवनशैली, छंद, प्रवासाच्या सवयी किंवा छाप पाडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाशी संबधित आहे. ही वाहने अनोख्या डिझाइनसह, आरामदायक, स्टायलिश आणि लक्झरी असतात. जीवनशैली वाहनांची संकल्पना बदलत्या मानसिकतेतून जन्माला आली.
ही वाहने तुम्ही कोण आहात हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. बहुउद्देशीय कारणांसाठी या वाहनांचा वापर केला जातो. कधी फिरण्यासाठी तर कधी गरज म्हणून. कॅराव्हॅन किंवा व्हॅनिटी व्हॅनचा वापर प्रामुख्याने कलाकार, उद्योगपती, खेळाडू करतात.