

अभिजित पेंढारकर
कोकणात अनेक प्रकारच्या बोलीभाषांचा संगम पाहायला मिळतो. मुंबईला जवळ असलेल्या ठाणे-पालघर पट्ट्यापासून ते तळकोकणातल्या सिंधुदुर्गापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी बोली कानावर पडते. आगरी-कोळी भाषेपासून ते मालवणीपर्यंतचं हे वैविध्य थक्क करणारं आहे.
भाषा आपल्या संवादाचं माध्यम असते. भाषा संस्कृतीची ओळख असते. भाषा आपल्याला जगवते. प्रगतीचं साधनही भाषाच असते. भाषा दोन प्रकारची असते. लिहिली जाणारी भाषा, जिला ग्रांथिक किंवा प्रमाणभाषा म्हणतात. तिच्यासाठी व्याकरणाचे नियम, अटी लागू होतात. दुसरी भाषा असते, ती लोकांनी केवळ बोलण्यातून जपलेली, वाढवलेली भाषा. तीच आपली बोलीभाषा.