
किशोर पेटकर
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील अखेरचे चार सामने बाकी असतानाच लिव्हरपूल एफसीने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. जागतिक पातळीवर गाजणाऱ्या या स्पर्धेत लिव्हरपूलने तब्बल विसाव्यांदा करंडक जिंकून मँचेस्टर युनायटेडच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शेवटचे चार सामने बाकी असतानाच लिव्हरपूल एफसीने दणक्यात विजेतेपदावर मोहोर उमटवली. जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय असलेल्या या व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलने तब्बल विसाव्यांदा करंडक जिंकण्याचा मान मिळवला. त्यांनी यासह मँचेस्टर युनायटेडशी बरोबरी साधली आहे. २०१९-२०मध्ये अखेरच्यावेळेस प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकलेल्या लिव्हरपूलला गतमोसमात वीस संघांत तिसरा क्रमांक मिळाला होता.