Dr. Holly Goodheadesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Iconic Bond Girl: मूनरेकर’मधली बॉन्ड गर्ल, डॉ. हॉली गुडहेड कोण आहे?
Moonraker's Dr. Holly Goodhead: ‘मूनरेकर’ चित्रपटात हॉली गुडहेडचा प्रभावी प्रवेश झाला. अंतराळातील तिच्या भूमिकेने बॉन्डपटांचे भविष्य बदलले.
प्रसाद नामजोशी
लुईस चिलीज ही अभिनेत्री खरं म्हणजे वेगळ्याच वाटेवर गेली असती. लुईसच्या घरातले सगळेजण तेलाच्या व्यवसायात होते. घरचं सगळं उत्तम चाललेलं असताना कॉलेजच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर लुईस झळकली आणि अचानक मॉडेलिंगमध्ये ओढली गेली. हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेलं दृश्य सौंदर्य तिच्याकडे निसर्गतः होतं आणि त्याला पूरक असा अभिनय तिला करता आला.