
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
जो कोणी क्रिकेटच्या खेळावर प्रेम करतो त्याने इंग्लंडला आले की लॉर्ड्स मैदानाला जरूर भेट द्यावी. इथे मैदान आणि गोड आठवणी जागवाव्यात. एमसीसीचे संग्रहालय जरूर बघावे, कारण ते छान आहे. फक्त हे सगळे बघताना भारावून व्हायला झाले तर कुठल्या बाबी लक्षात ठेवाव्या, त्याविषयी...
मिलिंद गुंजाळच्या नेतृत्वाखाली १९९४ मध्ये महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा क्रिकेट सामने खेळण्याबरोबर कसेही करून लॉर्ड्स मैदानाला भेट देण्याचा पक्का विचार नव्हता तर अगदी स्वप्न होते. माजी रणजीपटू मधू गुप्ते यांनी मला, प्रकाश वाकणकर आणि प्रसाद प्रधानला चक्क तीन तिकिटे दिली. सामना होता लॉर्ड्सला, तोही कसोटी सामना आणि वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड दरम्यानचा. थोडक्यात आम्हा तीन क्रिकेटवेड्या मित्रांसाठी ती मोठी पर्वणी होती. अगदी भारावलेल्या अवस्थेत आम्ही लॉर्ड्सजवळच्या सेंट जोन्स वूड ट्युब स्टेशनला उतरून चालत मैदानाला गेला.