Premium|Bus stop facilities : बसथांब्यांची दुरवस्था: प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

Public Transport Travel : प्रवासातील सुखद अनुभवापेक्षा बस थांब्यांवरील असुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, लहान मुले, वृद्ध आणि महिलांना तासनतास उभे राहून असुरक्षितरीत्या प्रवास करावा लागतो. स्थानिक प्रशासनाने प्रवाशांच्या या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव समोर आले.
Bus stop facilities

Bus stop facilities

esakal

Updated on

विठ्ठल काळे - mailvitthalkale@gmail.com

मुंबईमधील एका चित्रपटाचं शूटिंग संपवून मी घरी जायला निघालो. दहा तासांचा प्रवास! आरामदायक स्लीपर गाडी बुक केली. प्रवास दहा तासांचा असला तरी ट्रॅफिकने वाट अडवली; तर मात्र जुन्या हिंदी चित्रपटातील खलनायकाप्रमाणे त्याचं म्हणणं हेच असतं, ‘तुम आये अपने मर्जीसे थे, लेकिन जाओगे हमारे मर्जी से...’ त्यामुळे प्रवासात किती वेळ लागेल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आपण झोपून आरामदायी प्रवास केलेला बरा... हल्ली गाड्याही बऱ्या आहेत, वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज. वातानुकूलित स्वतंत्र आरामदायक बेड, एक ब्लँकेट, एक पाण्याची बाटली, चार्जिंग पॉइंट आणि हल्ली गाडीतच एक छोटं स्वच्छतागृह असतं. एवढ्या सगळ्या सोयी आरामदायक बसमध्ये असतात; परंतु प्रवासाचं भाडं काही खिशासाठी बरं नाही. सरकारी गाड्यांनी प्रवास करावा तर, ‘तुम्हाला आराम कसा मिळतो? हेच आम्ही बघतो’ असंच काहीसं म्हणणं असतं त्यांचं... बिचारी जनता काय करणार? अशा वेळी ज्यांना शरीराला आराम हवा, ते खासगी बसने प्रवास करतात. ज्यांना आपल्या खिशाला आराम हवा, ते सरकारी वाहनांनी प्रवास करतात; पण ट्रॅफिक खासगी किंवा सरकारी असा कोणताही भेदभाव करत नाही. ते सर्वांना समान वागणूक देतं. असो, ट्रॅफिक हा आपला मुख्य मुद्दा नाही. भल्याभल्यांना जमलं नाही ट्रॅफिकला हरवणं, आपण त्याच्या वाटेला न गेलेलं बरं. फुकट कोंडीत सापडायचो!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com