Premium|Rural Nursery Business : मुंबईतील नोकरी सोडून माधुरी-प्रतीक रत्नागिरीत का परतले? नर्सरी उभारून त्यांनी गावातील रोजगार, निसर्ग आणि स्थानिक अर्थकारण कसं बदललं?

Mumbai to Ratnagiri : मुंबईतील नोकरी सोडून माधुरी आणि प्रतीक रत्नागिरीत परतले. नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करत स्थानिक रोजगार, निसर्गसंवर्धन आणि गावच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली.
Rural Nursery Business

Rural Nursery Business

esakal

Updated on

सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com

मुंबईतील स्थिर आयुष्य सोडून माधुरी-प्रतीक आपल्या मुळांकडे परतले. रत्नागिरीत नर्सरी उभारताना त्यांनी केवळ स्वतःचं आयुष्य बदललं नाही, तर गावाभोवती रोजगार, निसर्ग आणि स्थानिक अर्थकारणाचं एक छोटं इकोसिस्टमही उभं केलं.

‘तूकाय करणार परत गावी येऊन’ माधुरीच्या बाबांचा हा पहिला प्रश्न होता, जेव्हा तिने सांगितलं की ती मुंबईतली नोकरी सोडून आता पुन्हा गावी येणार आहे. त्या दिवसापासून पुढचे काही दिवस तिचे बाबा तिच्याशी फारसं काही बोलले नव्हते.

बरीच वर्षं गेली. माधुरी-प्रतीक यांनी एकत्र मिळून गावातच काम सुरू केलं. नर्सरी चालवली. वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. दोघांना जेव्हा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, तेव्हा माधुरीच्या बाबांना हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं, की आपल्या मुलीचा निर्णय योग्य होता.

माधुरी-प्रतीक रत्नागिरीत ‘वृक्षवल्ली’ नावाने एक नर्सरी चालवतात. कोकणातील अनेक नर्सरीपेक्षा ‘वृक्षवल्ली’ नर्सरी वेगळी ठरते ती या दोघांच्या स्टोरीमुळेच!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com