
डॉ. अजित कानिटकर
शालेय जीवनात जीवनकौशल्ये शिक्षकांना आचरणातून संक्रमित करता येतील. आनंदाची, समतेची, परस्परविश्वासाची, स्त्री-पुरुष आदरभावाची, कर्तव्यपालनाची मूल्येही शिक्षकांना, संस्थांचालकाना कृतीतून शिकवता येतील. मग आनंदाचा वेगळा विभाग तयार करायला लागणार नाही.
मध्यप्रदेश सरकारने आनंदी राहण्याचे व आनंदी बनण्याच्या शिक्षणाचे अनुभव इयत्ता नववी ते बारावीतील शालेय स्तरावरील विद्यार्थी- विद्यार्थिनींना मिळायला हवेत, या विचारातून तसे पाऊल उचलले आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून या विषयाचा तेथील शाळांत अंतर्भाव होणार असून त्याची पुस्तकेही नुकतीच तयार झाली आहेत.