
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सर्वात अनुकूल, लाडका भाग म्हणून ओळख असणाऱ्या सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करुन, राजकारणाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच असल्याच्या अजित पवार यांच्या दाव्यावर या भागातील मतदारांनी शिक्कामोर्तब केले. काॅंग्रेसमधील कुरघोडीच्या राजकारणाचा फटका आघाडीला बसला आणि महायुतीच 'लाडकी' असल्याचे या जिल्ह्यात स्पष्ट झाले.