
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या संपाची चर्चा सुरू होती. होमिओपॅथिक डॉक्टर्स आता एक वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथिक उपचार करू शकतात का? अशी शंका ॲलोपॅथिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होताना दिसली. या वादामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती, पण आता नुकताच महाराष्ट्र सरकारने या वादात तात्पुरता विराम आणलेला आहे.
हा संपूर्ण विषय २०१४ पासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना सरकारने हा नियम जारी करण्याचं कारण काय? सरकारचं हे तात्पुरतं खंडन किती काळ टिकणार? खरंच होमिओपॅथिक डॉक्टर्सना एका कोर्सच्या आधारावर ॲलोपॅथिक उपचार करता येतील का? यावर होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक कर्मचाऱ्यांचं काय मत आहे? आणि याचा आपल्याशी थेट संबंध काय? हे सगळं समजून घेऊया ‘सकाळ प्लस’च्या या विशेष लेखातून...