
ॲड. अविनाश काकडे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश व उत्तरेकडील जिल्ह्यांत २०२५-२६चा खरीप हंगाम एका नव्या संकटाची चाहूल घेऊन आलाय. त्यातही पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी.
मागील काही वर्षांत सततच्या हवामानबदलामुळे, उत्पादन खर्चात झालेली वाढ, हमीभावाचा अभाव आणि शासकीय योजनांच्या अपयशामुळे शेतकऱ्यांच्या संकटात सातत्याने भर पडली आहे. मात्र या वर्षी परिस्थिती आणखी गंभीर आहे. यंदाचा हंगाम दुबार पेरणी, बनावट बियाणे, कोरडे आकाश आणि दिरंगाईचे प्रशासन अशी चौफेर कोंडी घेऊन उभा आहे.