
संजय जोग
सुशासनासाठी अल्पकालीन लोकप्रियता नाही तर आर्थिक विवेक आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक महत्त्वाची आहे पण तेच अंतिम ध्येय नसावे. राज्याच्या भांडवली खर्चाचे मोल चुकवून पूर्ण करता येणाऱ्या निवडणूक आश्वासनांचा आढावा घेतला पाहिजे, असे मी सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला आवाहन करतो.
लोकशाही मूल्यांच्या हितासाठी यावर एकमत निर्माण करणे गरजेचेच आहे’’ - उपराष्ट्रपती जगदीप धनकड उपराष्ट्रपतींचे हे अतिशय प्रभावी अन् अंतर्मुख करणारे वक्तव्य महाराष्ट्रासह सर्व राज्यांसाठी डोळे उघडणारे आहे.