
क्रीडा विकास करायचा झाला तर निधीचा अडसर दूर करणे आवश्यक आहे. अनेक वेळा क्रीडा धोरणातील शिफारशी अमलात आणण्यासाठी निधी अपुरा पडतो, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने यापूर्वीही आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी मंजूर केला आहे आणि भविष्यातही तशीच भूमिका ठेवली जाईल, असे अपेक्षा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सदानंद पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.