
प्रा. डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार
राज्य सरकारने एक जून रोजी विधानसभेत विविध योजना आणि प्रकल्पांसाठी निधी वाटप करण्यासाठी ५७,५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. एकूण पुरवणी मागण्यांपैकी १९,१८३.८५ कोटी रुपये अनिवार्य खर्चासाठी; तर ३४,६६१.३४ कोटी रुपये नियोजित योजनांसाठी आणि ३,६६४.५२ कोटी रुपये केंद्र पुरस्कृत योजनांसाठी होते.
एकूण मागणी ५७,५०९.७१ कोटी रुपये असली, तरी राज्याच्या तिजोरीवर निव्वळ आर्थिक परिणाम ४०,६४४.६९ कोटी रुपये आहे, असे विधानसभेत सरकारतर्फे सांगण्यात आले. या निमित्ताने राज्याची आर्थिक स्थिती आणि पुरवणी मागण्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे.