
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
महाराष्ट्रात सध्या सुरचित, सुस्थापित अशा रचना, व्यवस्था, संस्थांना वेगाने सुरूंगच तेवढे लावण्याचे प्रयोग राज्यकर्ते, त्यांचे प्रशासन मिळून करत आहे. तसेच कोणीही मागणी न केलेल्या गोष्टी, मागणी केल्या जाणाऱ्या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत जनतेची, अभ्यासक, तज्ज्ञांची पर्वा न करता लादण्याचा सपाटाच लावला आहे.
याचा बळी शासनाच्या भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक संस्था, मंडळे, समित्या जशा ठरत आहेत. संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच वेठीला धरली जात आहे. त्यायोगे मराठी भाषक राज्याची भाषा, संस्कृती, शिक्षण अशा पायाभूत बाबींचा पायाच खिळखिळा होतो आहे.