
Environmental conservation
esakal
हवामान बदलाचे संकट आता तीव्र होत असताना, त्याचा सामना करण्यासाठी वेळीच उपाययोजनाही करणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडूनही या आव्हानाला तोंड देण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम सुरू केले आहेत. या योजनांच्या यशापयशावरच राज्यातील पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे.
काही वर्षात राज्यात पावसाचे चक्र पूर्णतः बदलून गेले आहे. या बेभरवशाच्या पावसाने राज्यातील शेती आणखीच बेभरवशाची झाली आहे. मात्र पावसाच्या लहरीपणाचा परिणाम निव्वळ शेतीवर होत नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाला याची किंमत चुकवावी लागत आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांत ओला दुष्काळ पडला आहे. मुंबईत या मोसमात २१ सप्टेंबरपर्यंत ५५७९ मिलिमीटर एवढा अकल्पनीय पाऊस नोंदवला गेला आहे. याशिवाय मे महिन्यात ८८१ मिलिमीटर पाऊस झाला.