
डॉ. चंद्रहास देशपांडे
महाराष्ट्र राज्याला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याची अर्थव्यवस्था गेली कित्येक वर्षे देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था सातत्याने राहिली आहे व आज ती भारताच्या देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) सुमारे १२ ते १३ टक्के योगदान देते. मात्र दरडोई उत्पन्नात काही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्याच्या उद्योगव्यवस्थेची भावी दिशा काय असेल, याचा विचार करून योग्य पावले टाकली तर राज्याला औद्योगिक समृद्धीकडे नेता येईल. त्याची रूपरेखा मांडणारा लेख.
भा रताच्या देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) बारा ते तेरा टक्के योगदान देणाऱ्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मोठी राहिली आहे. मात्र कर्नाटक, गुजरात, तमीळनाडू ही राज्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्याच्या उद्योगव्यवस्थेची भावी दिशा काय असेल, या विषयाचा विचार करताना आधी महाराष्ट्राची आर्थिक बाबतीतील काही ठळक वैशिष्ट्ये पाहू.