
सूरज मांढरे
राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धातच मॉन्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पावसाने सुरुवात केली. काही जिल्ह्यांमध्ये ही पावसाची सुरुवात अतिवृष्टीच्या स्वरूपात झाली आणि परिणामी पूर्वमशागतीची कामे विस्कळित झाली.
जूनच्या सुरुवातीस काही भागांत पावसात खंड पडला, तर काही ठिकाणी कडक उन्हाची लाट आली. पेरणीसाठी आवश्यक असलेली आर्द्रता कमकुवत राहिल्याने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. दुसऱ्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस पडला, मात्र त्याचे वितरण असमान होते. अशा विरोधाभासी हवामानात खरीप हंगामाची पेरणी होणे ही मोठी कसरत ठरली आहे.