
प्रा. डॉ. प्रकाश पवार
महाराष्ट्रातील भाजप, मुख्यमंत्री, विधानसभेच्या अध्यक्षांपुढे हिंदुत्व आणि विकास हाच ऐरणीवरचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे घटनात्मक लोकशाही प्रक्रिया राबविणारी विचारसरणी हिंदुत्व ही आहे. यामुळे परंपरांचा आधार घेऊन विरोधी पक्षनेता हे पद भरण्याच्या मार्गामध्ये हिंदुत्व ही एक महत्त्वाची अडचण आहे.
थोडक्यात घटनाकारांना राज्यकर्त्या वर्गाची विचारसरणी कोणती आहे. हा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. विचारसरणीनुसार घटनात्मक लोकशाही प्रक्रिया राबविण्यामध्ये फेरबदल घडणार असे वाटत होते. म्हणजेच विचारसरणी हाच मुख्य अडचणीचा मुद्दा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद भरले जाण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दिसत नाही.