
संजय जोग
विधानभवनाच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांतील तुफान हाणामारीनंतर विधिमंडळाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. खुद्द मुख्यमंत्र्यांना याविषयी सभागृहात खेद व्यक्त करावा लागला.
या व इतर अनेक घटनांनी अधिवेशन झाकोळले गेले. तरीही नीतिमूल्याची आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिमा संवर्धनांची जाणीव करून देणारे हे अधिवेशन ठरले. हे अधिवेशन राज्य सरकारसाठी संमिश्र उपलब्धीचे होते, तर विरोधकांसाठी नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला आव्हान देण्यासाठी त्यांची कामगिरी सुधारण्यासाठीची रणनीती अधिक तीव्र करण्याची संधी देऊन गेले.