
सम्राट फडणीस
महाराष्ट्र विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनातील दोन घटना.
पहिली १८ जुलैची. भाजप आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचं मतप्रदर्शन केलं. प्रश्न होता चतुर्थ श्रेणी स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरं देण्याचा. विषय उपस्थित झालेला ठाणे शहराच्या निमित्तानं.
नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत सांगितलं, की १९८६ मध्ये राज्य सरकारनं यासंदर्भात निर्णय घेतला. तेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याचा हा निर्णय होता.