

Maharashtra Maternal Health: What’s Making Pregnancy and Childbirth Safer
E sakal
Maharashtra Maternal Health: How Healthcare Improvements Are Saving Mothers
डॉ. ऋषिकेश प्रे. खडसे, (वरिष्ठ संशोधन अधिकारी, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई)
संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार (SDGs) २०३० पर्यंत जागतिक मातृ मृत्यू गुणोत्तर प्रति १ लाख यशस्वी जिवंत जन्मांमागे ७० पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य आहे.
नमुना नोंदणी प्रणालीच्या (SRS) अलीकडील अंदाजानुसार, महाराष्ट्राने हे लक्ष्य आधीच साध्य केले आहे. २०२२-२४ या कालावधीत राज्याचा मातृ मृत्यू गुणोत्तर ३७, तर राष्ट्रीय स्तरावर ८७ आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६ (NFHS-6), २०२३-२४ मधील आकडेवारी पाहिल्यास गर्भधारणेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत महिलांना मिळणाऱ्या आरोग्यसेवांच्या वापरामध्ये सातत्याने सुधारणा झाल्याचे दिसते.