
यंदाही पाऊस साधारण १० जूननंतरच राज्यभरात पसरेल, असं वाटणं काही चूक नव्हतं. मात्र यंदा पाऊस राज्यातल्या विधानसभा निकालासारखा आला. काहीच कळत नाही, जे जिंकले त्यांनाही तितकाच धक्का बसला आहे जितका हरले त्यांना बसला... ‘असं झालंच कसं?’ हा एकमेव प्रश्न विधानसभेच्या निकालाने दिला, तसाच या पावसाने दिला. ‘असं झालंच कसं?’ मग काय काय कारणं दिली गेली... काहीच सिद्धही झालं नाही, होऊ शकत नाही. एकच सत्य, आलेला निकाल स्वीकारा!