
राज्यात बहुमताचे नवे सरकार स्थापन झाले. आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप यांना लागलेला विलंब पाहता सत्ताधाऱ्यांतील कुरबुरी संपलेल्या नाहीत. विरोधी आघडीही एकजिनसीपणाने काम करताना दिसत नाही.
सोबत राहू एकदिलाने,
घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने,
समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
अशी कविता महाराष्ट्राचे ‘पुन्हा आलेले’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकवली असून, महाराष्ट्राला आता वेगळ्या उंचीवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, अशी ग्वाही त्यांनी नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिली.