
डॉ. अजित नवले
महाराष्ट्रभरातून लोकशाहीवादी संघटनांनी तीव्र विरोध केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अखेर नऊ जुलै रोजी विधानसभेत व दहा जुलै रोजी विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. शहरी नक्षलवादाचा बंदोबस्त करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने सांगितले जात आहे.
मात्र नक्षलवादाचे केवळ नाव आहे, या कायद्याच्या आडून सरकारच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपून टाकण्याच्या उद्देशानेच हे विधेयक आणले जात आहे, असा आवाज मोठ्या प्रमाणात उमटत आहे.