
डॉ. अनंत सरदेशमुख
महाराष्ट्राची आर्थिक क्षेत्रातील वाटचाल २०२८ पर्यंत एक ‘ट्रिलियन डॉलर’ची अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने सुरू आहे. देशांतर्गत सकल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचे योगदान सुमारे १३ टक्के आहे. सध्या ही अर्थव्यवस्था सुमारे ४५ हजार कोटींच्या आसपास आहे. म्हणजे राज्याला हे ध्येय गाठण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्राला आपला ‘सकल राष्ट्रीय उत्पादना’तील सहभाग सुमारे सात टक्के वाढवावा लागणार आहे.
भारत २०२७-२८ पर्यंतच आपली पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे ध्येय साध्य करेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सांगितले. म्हणजेच या काळात भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. त्यासाठी अर्थातच सर्व राज्यांचे सहकार्य आवश्यक आहे. यात महाराष्ट्रासारख्या उद्योगांत आघाडीवर असलेल्या राज्याची यात मोठी महत्त्वाची भूमिका असेल. हे राष्ट्रध्येय साध्य करण्यास हे राज्य नक्कीच सक्षम आणि सज्ज आहे. महाराष्ट्रातील उद्योजकता अनेक आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य बाळगून आहे.