
मुंबई: एखादी नवी कल्पना डोक्यात आहे, पण प्रत्यक्षात आणायचं म्हटलं की लगेच मनात येतं. पैसा कुठून आणायचा? मार्गदर्शन कुठे मिळेल? आपल्यासारख्या सामान्य माणसाला कोण संधी देईल? आता या गोष्टींची चिंता सोडून द्या. कारण महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.
महाराष्ट्र सरकारने आणलेलं ‘महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरण’ ग्रामीण भागातले लोक, गरीब कुटुंबातील तरुण आणि स्त्रियांसाठी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत ५०,००० नवीन स्टार्टअप्स सुरू होणार आहेत. यासाठी ५०० कोटींचा फंड उभारण्यात आला आहे. लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी ३०० एकरमध्ये ‘महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार आहे. लोकांची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने ३ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
हे धोरण नेमकं काय आहे, त्यामागचा उद्देश काय, सामान्य युवक युवतींना यातून काय फायदा होऊ शकतो, आणि तुम्ही सुद्धा यात सहभागी होऊन उद्योजक कसे बनू शकता? या गोष्टींविषयी जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.