
नीरज हातेकर
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५७,५०९ कोटी रुपयांच्या पूरक मागण्या सादर केल्या. पूरक मागण्या म्हणजे वार्षिक अर्थसंकल्पात दिलेल्या अंदाजापेक्षा जास्त निधीसाठी विधिमंडळाकडे केलेली मागणी होय. २०२५-२६चा अर्थसंकल्प मार्चच्या शेवटी मांडला गेला.
त्यात आधीच ४५,८५१ कोटी रुपयांची महसुली तूट होती आणि राजकोशीय तूट १,३६,२३५ कोटी रुपये होती. आता यात आणखी ५७ हजार ५०९ कोटी रुपयांची भर पडणार असून, एकूण तूट आता १,९३,७४४ कोटी रुपये होणार आहे.