
राज्य परिवहन महामंडळाची स्थापना १९४८ मध्ये झाली. या ७७ वर्षांच्या कालावधीत गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील सिरोंचा, एटापल्लीपासून सह्याद्रीच्या कडेकपारीतील गावांपर्यंत आणि राज्याच्या सीमा ओलांडूनही पाच-सहा राज्यांत एसटीची भ्रमंती सुरू आहे. दररोज ५५ लाखांपेक्षा अधिक लोक एसटी प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र बहुतांश वेळा त्यांना मनस्तापच सहन करावा लागतो. आता या एसटीचे स्टिअरिंग परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांच्या हाती आले आहे. नवनवीन संकल्पना , उपक्रम राबवून ते एसटीच्या परिवर्तनासाठी नियोजन करत आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या याच नियोजनावर ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सदानंद पाटील यांनी साधलेला संवाद...