
डॉ. सतीश वाघ
राज्याच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेला गती व बळकटी देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याची भरभराट करणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या उद्योगांना राज्य सरकारने अनुदान दिली नाहीत तरी चालतील. पण त्यांना सुरळीतपणे वर्षाचे सर्व दिवस व्यवसाय करता यावा, अशी व्यवस्था व्हावी. अर्थसंकल्पात त्या दिशेने पावले टाकून तशी तरतूद केल्यास राज्याची भरभराट होईल.
राज्याच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देणे आणि जीवनमान सुधारणे हा हेतू असल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. त्यासाठीचा एक बैठकही मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घेतली विविध प्रकल्पाचा आढावा घेतला.
यात प्रामुख्याने मेट्रो प्रणाली, महामार्ग, सिंचन योजना, विमानतळ, बंदरे आणि पर्यटन यांचा समावेश आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पायाभूत सुविधा नसतील तर उद्योगांची वाढ होणार तरी कशी आणि राज्याचे उत्पन्न वाढणार तरी कसे? त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.